⚡सावंतवाडी ता.०१-: श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवार ४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीमंत मेजर खेमसावंत (पंचम) तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ‘खेमराजीय’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार असून प्रशासकीय सेवेतील संधी या विषयावर मार्गदर्शनही केले जाणार आहे.
या समारंभाचे अध्यक्षस्थान श्रीमंत खेमसावंत भोंसले (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी) हे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित राहून विद्यार्थ्यांना “प्रशासकीय सेवेतील संधी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम ह.हा. श्रीमंत शुभदादेवी भोंसले (राणीसाहेब), युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले (कार्यकारी विश्वस्त), युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले (विश्वस्त), सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल (श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी), नियामक मंडळ सदस्य आणि सर्व सभासद यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.