पाट येथील अल्पेश घारे याची मनमोहक कलाकारी..
कुडाळ : कला आणि क्रिकेट यांचा अनोखा संगम कुडाळ तालुक्यात पाहायला मिळाला आहे. कुडाळ-पाट परिसरातील सुप्रसिद्ध चित्रकार अल्पेश घारे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचं तब्बल १५ फूट उंचीचं भव्य पोर्ट्रेट निवती समुद्रकिनारी साकारलं आहे.
अल्पेशला कलेचे प्राथमिक शिक्षण पाट हायस्कूल मध्ये मिळाले पाट हायस्कूल मध्ये असतानाच राज्यस्तरीय स्पर्धेतही प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे त्याला भव्यदिव्य कलाकृती काढण्याची खास हौस आहे यापूर्वीही मोठमोठ्या कलाकृती समुद्रकिनारी रेखाटल्या आहेत त्याच्या कलाकृती साठी किनारा हाच कॅनव्हास आहे कलाशिक्षक संदीप साळसकर याच्या कलाविषयक उपक्रमात अल्पेशचा नियमित सहभाग असायचा
विशेष म्हणजे हे चित्र निवती येथील समुद्रकिनारी रांगोळी आणि कलर स्प्रेच्या माध्यमातून रेखाटण्यात आले असून, पावसाळ्याच्या प्रतिकूल हवामानातही अल्पेश यांनी जिद्दीने हे काम पूर्ण केले. जोरदार पाऊस, वारे असूनही त्यांनी दीड तासामध्ये हे भव्य चित्र पूर्ण केले.
या अद्वितीय कलाकृतीसाठी अल्पेश यांना विठ्ठल माधव, भावेश घारे, आणि मंजिरी घारे या त्यांच्या मित्रमंडळींची मोलाची साथ मिळाली. अल्पेश घारे हे विराट कोहली यांचे खूप मोठे चाहते असून, क्रिकेटप्रेमातूनच त्यांना ही कलाकृती साकारण्याची प्रेरणा मिळाली.