पंचायत समिती उपसभापती राजू परुळेकर यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
*💫मालवण दि.२९-:* मालवण तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर आचरा येथील शासकीय विश्रामगृहाची सर्व सोयींनी युक्त असलेली इमारत ताब्यात घेऊन याठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरू करावे, अशी मागणी पंचायत समिती उपसभापती राजू परुळेकर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. रुग्ण संख्या वाढत असताना जास्तीस जास्त उपचार केंद्रे असणे आवश्यक आहे. आचरा येथील शासकीय विश्रामगृह वापरात नाही. ते सर्व सोईनी सुसज्ज आहे. त्यामुळे हे शासकीय विश्रामगृह आपण आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नवीन कोरोना उपचार केंद्र सुरू करावे. त्यामुळे आचरा व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आचरा शासकीय विश्रामगृहात तात्काळ कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करावी. तसेच तेथे एक वाहन चालकासह उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परुळेकर यांनी केली आहे.
