शिवडाव येथील बंद घर चोरट्याने फोडले…

६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास..

कणकवली : शिवडाव – मांगरवाडी येथील श्रीगणेश श्रीधर जाधव यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले. चोरट्याने घरातील ब्लेंटेक्सचे दागिने, माईक, पितळेची कृष्णमूर्ती आदी मिळून ६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची फिर्याद श्रीगणेश यांचे चुलत बंधू मोहन पुंडलिक जाधव (रा. शिवडाव जाधववाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीनुसार श्रीगणेश मुंबईला राहत असल्यामुळे त्यांचे गावचे घर बंद असते. मोहन यांनी श्रीगणेश यांचे घर सोमवारी सकाळी 6:25 वाजण्याच्च्या सुमारास बघितले तेव्हा ते सुस्थितीत होते. मात्र सायंकाळी ६ वाजता त्यांनी पाहिले असता घराचे मागचे व पुढचे असे दोन्ही दरवाजे फोडलेले दिसले. त्यांनी आज जाऊन पाहिले असता घरातील चारही बेडरुमची कुलुपे तोडलेली दिसली. पुढील पाहणीत एका बेडरूममधील दोन हजाराचे गणेश मूर्ती सजावटीचे ब्लेंटेक्सचे दागिने, चार हजार रुपयांचे माइक, दोनशे रुपयाची पितळेची कृष्णमूर्ती असा मुद्देमाल चोरीस गेलेला आढळला. याबाबत मोहन यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे करीत आहेत.

You cannot copy content of this page