वेंगुर्ला रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी आनंद बोवलेकर…

वेंगुर्ला प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या २०२५-२६ या वर्षासाठी क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून आनंद बोवलेकर, सचिवपदी डॉ. राजेश्वर उबाळे तर खजिनदारपदी अनमोल गिरप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नूतन कार्यकरणीचा पदग्रहण सोहळा बुधवार दि. २५ जून रोजी साई डिलक्स हॉल येथे संध्याकाळी ७ वाजता संपन्न होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष योगेश नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
या पदग्रहण सोहळ्याला असिस्टंट कोऑर्डीनेटर अॅण्ड पोलिओ झोन ७ चे नासिरभाई बोरसादवाला व डॉ.प्रशांत कोलते यांच्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील ११ प्रेसिडेंट उपस्थित राहणार आहेत. यावेळी रोटरी क्लब सदस्यांच्या पाल्यांचा आणि तालुक्यातील शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत, गरजू विद्यार्थ्यांचा तसेच रक्तदाते जय मांजरेकर, आरोग्यसेविका विनिता तांडेल, वायरमन विशाल चेंदवणकर, चार्मिग मिस इंडिया किताबाची मानकरी किरण मेस्त्री, शरीरसौष्ठवपटू मंगेश गावडे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. मागील वर्षी गरजू शेतक-यांना फळझाडे वाटप, बॅटमिटन लिग, मोफत नेत्र तपासणी शिबिर, मूळव्याध मोफत उपचार शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, मोफत कॅन्सरी तपासणी व उपचार शिबिर आदी उपक्रम घेण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष योगेश नाईक यांनी दिली.

You cannot copy content of this page