⚡बांदा ता.२४-: वाफोली अन्नपूर्णावाडी येथील गणेश बाबाजी सावंत यांच्या राहत्या घरावर शेगलाचे झाड पडल्याने घराच्या छपराचे नुकसान झाले. आज सकाळी झालेल्या वादळी पावसात हि घटना घडली.
आज सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस कोसळत आहे. सावंत यांच्या घराच्या छपरावर झाड पडल्याने सिमेंट पत्रे फुटले. यामुळे सावंत यांचे नुकसान झाले आहे.
वाघोली येथील घरावर शेगलाचे झाड पडल्याने घराच्या छपराचे नुकसान…!
