वेंगुर्ला प्रतिनिधी- सुमारे शंभरपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाई मंदिरात २३ जूनपासून अखंड विणा सप्ताहाला प्रारंभ झाला आहे.
सप्ताह कालावधीत रोज संगीत व वारकरी भजने, विठ्ठल रखुमाईची आकर्षक पूजा तसेच दि. २९ रोजी सायंकाळी ‘ज्ञानोबा तुकाराम‘च्या जयघोषात, ढोलताशांच्या गजरात दाभोसवाडा व विठ्ठलवाडी येथील दिड्या मंदिरात येणार आहेत. या दोन्ही दिड्यांमध्ये वारकरी वेशभूषा केलेले भजनी मंडळी आणि पौराणिक कथांवर आधारीत केलेल्या विविध वेशभूषा आदींचा समावेश असणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.
फोटोओळी – दाभोसवाडा विठ्ठल रखुमाई