उमेश गाड यांची भावना..
⚡बांदा ता.२२-: गोव्याच्या मुक्तिसंग्रामात बांदावासियांचे अतुल्य योगदान आहे. गोमंतकीय जनता हे योगदान कधीही विसरू शकत नाही. माझ्या स्वर्गीय वडिलांसोबत त्याकाळी बांद्यातील जनता खांद्याला खांदा लावून लढली. त्यामुळे बांद्यातील माझा सत्कार हा विशेष असल्याचे भावोद्गार कडशी-मोपा (गोवा) येथील उमेश गार्ड यांनी काढले.
स्वातंत्र्यसैनिक (कै.) शंकर गाड यांच्या पश्चात उमेश गाड यांना गोवा शासनाने सरकारी नोकरीत सामावून घेतले आहे. त्यावेळी त्यांचा बांदा येथे छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री गाड बोलत होते.
येथील नट वाचनालयात पार पडलेल्या या सोहळ्यात वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे माजी सचिव मयूर चराटकर, विद्यमान सदस्य अजित दळवी, पत्रकार प्रवीण परब, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू आदी उपस्थित होते.
यावेळी श्री गाड यांनी गोवा मुक्ती संग्रामातील आपल्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या. तसेच त्याकाळी बांद्यातील जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल आभारही व्यक्त केले.