वेंगुर्ला प्रतिनिधी- संत निरंकारी मिशन तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून सिधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, माजगांव, कणकवली, देवगड आणि वेंगुर्ला येथे एकाचवेळी पाच ठिकाणी योग शिबिर घेण्यात आले. सर्वच ठिकाणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, वेंगुर्ला आणि तळवडे येथे पार पडलेल्या शिबिराप्रसंगी मनाच्या तंदुरूस्तीसाठी प्राणायामची गरज आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची आहे. त्यासाठी धावपळीच्या जीवनात योग साधना करावा असे आवाहन सावंतवाडी येथील पतंजली युवा भारत संस्थेचे मुख्य योग शिक्षक विद्याधर पाटणकर यांनी केले.
फोटोओळी-संत निरंकारी मिशनच्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.