कट्टा येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡मालवण ता.२१-:
युवा सामाजिक कार्यकर्ते, आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त कट्टा येथील स्मिता कंप्युटर इन्स्टिट्युटच्यावतीने कट्टा येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात कट्टा परिसरातील १०१ गरजू लोकांची रक्त तपासणी, थायरॉईड, कॅल्शियम, हिमोग्लोबीन, सीबीसी, डायबेटिस, थायरॉईड फंक्शन टेस्ट करण्यात आल्या. तर २५ जणांनी इसीजी रिपोर्टचा लाभ घेतला.

या शिबिराचे उदघाट्न कट्टा गुरामवाडी ग्रामपंचायत सरपंच शेखर पेणकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्मिता कंम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका सौ. श्रद्धा नाईक, आभाळमायाचे मार्गदर्शक सुनील नाईक, परमानंद वेंगुर्लेकर गुरुजी, कट्टाचे आरोग्य सेवक आदेश घाडी, आरोग्य सेविका सौ. ज्योती पाटकर, सौ. मीरा तावडे टेलिमेडीसीन आणि स्मिता कंम्प्युटरचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच पेणकर यांनी स्मिता कंम्प्युटर एज्युकेशनकडून समाजोपयोगी कार्यक्रम राबून समाजातील लोकांना, मुलांना ही तपासणी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या.

या शिबिर प्रसंगी आभाळमाया ग्रुपचे सदस्य डॉ. प्रथमेश वालावलकर, वराड ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष छोटू ढोलम, अॅड. प्रदीप मिठबावकर, रामचंद्र आंबेरकर, राहुल डगरे, वराडकर हायस्कूलचे श्री. वाजंत्री सर, श्री. भाट सर, श्री. कानुरकर सर, घनश्याम राणे, शशिकांत परब, दिनेश राऊळ, बाळा चव्हाण, गौतमेश्वर नाईक, उमेश मिरजकर, हरी मोरजकर, दीपिका वेंगुर्लेकर, श्रीमती प्रतीक्षा परब, सौ. कांचन ढोलम, सौ. सीमा पडते, सौ. मोरजकर, सौ. हंसू रावले शिवाय परिसरातील इतरही महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तु देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मिता कंम्प्युटर आणि आभाळमायाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी सौ. प्रगती कसालकर स्टाफ नर्स, रंजना फाटक HLL लॅब टेक्निशियन, आशा सेविका सौ. मृण्मयी ढोलम, मुख्य प्रवर्तक सौ. नाईक यांचे सहाय्य लाभले. त्याचप्रमाणे स्मिता कंम्प्युटरच्या आणि आभाळमायाचे रक्तदाती सविता शिरोडकर, सानिका गावडे, ओंकार वराडकर यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्य लाभले.

You cannot copy content of this page