ओझर विद्यामंदिरमध्ये दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡मालवण ता.२१-:
मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव या शाळेतील दहावी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रशालेत संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या वतीने तसेच इतर मान्यवर पुरस्कर्त्यांच्या वतीने विविध प्रकारची पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मालवण पंचायत समितीचे माजी सभापती तथा संस्थेचे पदाधिकारी उदय परब, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सदस्य विजय कांबळी, केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, माजी विद्यार्थी तथा पारितोषिकाचे पुरस्कर्ते सुरेश रामचंद्र भोजने, कांदळगाव सरपंच रणजीत परब, ग्रा. पं. सदस्या सौ. शारदा मुळये, प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती यू. डी. मुरवणे, प्रशालेचे मुख्याध्यापक सी.डी. जाधव आदी मान्यवर उपास्थित होते.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी सुधीर भगवान परब, माजी विद्यार्थी तथा मुंबई येथील बँक ऑफ बडोदाचे निवृत्त व्यवस्थापक सुरेश रामचंद्र भोजने, शालेय समिती सदस्य जयराम कांबळी, तसेच शाळेतील शिक्षक अभय शेरलेकर, पांडुरंग राणे व प्रवीण पारकर यांनी पुरस्कृत केलेली पारितोषिके तसेच संस्थेकडून व माजी सभापती उदय परब यांच्याकडून भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी शाळेतून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी अनुक्रमे भूमिका सदानंद कोचरेकर व संचिता संदेश परब तसेच यावर्षी इयत्ता दहावी मध्ये असलेल्या लाजरी मिलिंद कांदळगावकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना उदय परब यांनी पुढील वर्षीपासून ओझर विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांमधून जिल्हास्तरीय तालुकास्तरीय व शाळा स्तरीय प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला अनुक्रमे रोख रुपये १११११/- , ५५५५/- व २२२२/- अशा प्रकारचे पारितोषिक जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पारकर यांनी तर आभार पी.के. राणे यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page