चौके-देवली मार्गांवर काटेरी झाडीमुळे अपघातांचा धोका…

शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष : तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी..

मालवण दि प्रतिनिधी :
चौके-देवली मार्गांवरील रस्त्याच्या बाजूने वाढलेली काटेरी झाडी वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. तरी जिल्हापरिषद बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे यांनी केली आहे.

याबाबत संबंधित विभागाचे लक्ष वेधताना राजा गावडे यांनी सांगितले, या मार्गांवरून प्रवास करताना मोठया प्रमाणात वाढलेली झाडी वाहनचालकांना सातत्याने त्रासदायक ठरत आहे. मुळात अरुंद अश्या या रस्त्यावर मोठे वाहन आल्यावर बाजू देणारा मोटारसायकल चालक यांना तर अधिकच त्रासदायक स्थिती आहे. अपघातांची भीती निर्माण झाली आहे. तरी याबाबत तातडीने कार्यवाही करावी. अशी लक्षवेधी मागणी करण्यात आली आहे.

फोटो : राजा गावडे

You cannot copy content of this page