श्री रेकोबा विद्यालयात शिक्षण तज्ञ कै. सुभाष शंकर फाटक यांची पुण्यतिथी साजरी…

⚡मालवण ता.२०-:
समाजात अनेक सत्पुरुषांनी समाज घडविण्यासाठी जे योगदान दिले आहे ते दिशादर्शक असून समाजधुरीनांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांनी करून घेऊन त्यादृष्टीने वाटचाल केली तर जीवन सुखकर बनेल म्हणूनच मुलांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महापुरुषांचा आदर्श ठेवला पाहिजे प्रतिपादन मालवण येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी येथे बोलताना केले.

डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित मालवण येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात शिक्षण तज्ञ कै.सुभाष शंकर फाटक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी शिक्षण तज्ञ कै.सुभाष शंकर फाटक यांच्या कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाची सुरुवात कै. सुभाष फाटक सरांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी फाटक सरांच्या कार्याची ओळख नंदकिशोर डगरे यांनी केली, तर आभार प्रवीण कुबल यांनी मानले.

या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे शिक्षक शुभदा शिंदोळकर,श्रीनाथ फणसेकर, संभाजी कोरे ,रामचंद्र गोसावी, रोहिणी दिघे, मिताली मोंडकर ,यशवंत गावकर, दत्तात्रय गोसावी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page