नरडवे भर्देवाडी शेत जमीन मृतदेह प्रकरण
*💫कणकवली दि.२९-:* नरडवे भेर्देवाडीत सुशांत धोंडू कदम यांच्या शेतजमिनीत जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अज्ञात यवकाचा मृत्यू संशयास्पद असून त्यादृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. एलसीबी ची टीम आणि श्वानपथक नरडवेत दाखल झाले आहे. बुधवारी रात्री घटनास्थळी जात डीवायएसपी डॉ नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी प्राथमिक पाहणी केली होती. दरम्यान आज सकाळी पुन्हा डिवायएसपी डॉ.कटेकर, पोलीस निरीक्षक मुल्ला , एपीआय सागर खंडागळे यांनी घटनास्थळी जात सखोल चौकशी सुरू केली आहे.दरम्यान अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटली नसून हा घातपात असावा या दृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आहेत.
