आराम बसची हुल ; ट्रक पलटी…

ट्रकचे मोठे नुकसान ; जीवितहानी नाही..

कणकवली : समोरून येणाऱ्या आरामबसने हुल दिल्याने कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूने पलटी झाला. कणकवली – फोंडाघाट राज्य मार्गावरील करूळ येथील कारखाना थांब्यानजीक बुधवारी सकाळी ६ वा. सुमारास झालेल्या या अपघातात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नसली तरी ट्रकचे बरेच नुकसान झाले. ट्रक सिमेंटशी संबंधित एका द्रव्याची वाहतूक करत होता. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक विद्युत वाहिनीच्या पोलला देखील धडकला अशी माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर विश्वजीत कर्णिक, कृष्णा निकम, राजेश निकम व स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला केबिन बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. यावेळी रस्त्यावर झालेले वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली. सदर अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद नव्हती. रात्री ९:३० वाजेपर्यंत ट्रक पलटी झालेल्या स्थितीच होता.

You cannot copy content of this page