एस. एम. प्रशालेच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी…

⚡कणकवली ता.३०-: येथील एस. एम. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या तायक्वांदो स्पर्धा व तेथे कर माझे जुळती या यूट्यूब चैनल मार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रशालेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये प्रशालेची विद्यार्थिनी शरयू पाटील हिने 14 वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तिची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी झाली.

त्याचप्रमाणे ‘तेथे कर माझे जुळती’ या यूट्यूब चॅनल मार्फत इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विद्यार्थ्यांसाठी ‘मोबाईल फोन शाप की वरदान’ या ऑनलाइन निबंध स्पर्धेत प्रशालेच्या इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी वैदेही प्रधान हिने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे.

या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवली चे कार्याध्यक्ष डॉ. एस. सी. सावंत, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष डॉ. एस. एन. तायशेटे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page