सावंतवाडीत उद्या कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचे उद्घाटन…!

सावंतवाडी, दि. १७ (प्रतिनिधी):
कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडीच्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन उद्या बुधवार, दि. १८ जून रोजी सकाळी ११ वाजता रत्नेश प्लाझा, साळईवाडा येथे होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास रेक्टर मिलाग्रीस कॅथेड्रल रेव्ह. फा. मिलेट डिसोजा, श्रीमती. अॅमी डॉक्टर तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुजय कदम आदि प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत.

सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन श्रीमती. आनामारी डिसोजा, व्हा. चेअरमन श्री. पीटर डिसोजा व सेक्रेटरी श्री. मार्टिन आलेमेडा यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग सज्ज आहेत.

You cannot copy content of this page