मा. नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांची प्रमुख उपस्थिती..
⚡सावंतवाडी ता.१६-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा क्र. 6, भटवाडी येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षणतज्ज्ञ श्री. दिलीप भालेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. केशव जाधव, सहाय्यक शिक्षिका सौ. सायली लांबर, तसेच अध्यक्ष समीक्षा खोचरे, उपाध्यक्ष पूनम तुयेकर, ईश्वरी तेजम, श्रीम. अनिशा राणे, गुरुप्रसाद तेजम, अनुष्का केरकर, सौ. सावंत, बालवाडी शिक्षिका गावडे मॅडम, मयुरेश तुयेकर, श्रीम. संगीता चव्हाण, सौ. साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मा. नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणतज्ज्ञ श्री. दिलीप भालेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच संस्कारही अंगीकारावेत, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. केशव जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन सहाय्यक शिक्षिका सौ. सायली लांबर यांनी मानले.
