भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर:मालवणत भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..
⚡मालवण ता.१६-:
सर्वसामान्य कार्यकर्ता हीच भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. त्याच बळावर भाजपाचा सर्व निवडणुकीत विजय निश्चित होतो. मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपाच्या यशाचा आलेख आगामी सर्व निवडणुकीत असाच कायम राहिल. असा विश्वास भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला.
गेल्या 11 वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या गौरवशाली विकासपर्वाची माहीती अधिक सक्षमपणे जनतेपर्यंत पोहोचण्या करीता भारतीय जनता पार्टीने देशभरात ‘संकल्प से सिद्धी या अभियानात मंडल स्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच अनुषंगाने समर्थ मंगल कार्यालय’ कोळंब येथे भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर, यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली.
मोदी सरकारच्या गौरवशाली वैभव विकासपर्वाचा आढावा घेताना, सरकारच्या प्रमुख 176 योजनेपैकी प्रमुख कल्याणकारी योजनांची माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली. यानंतर पंचायत समिती, नगरपरिषद प्रभाग स्तरावर आणि गाव बैठकांमध्ये माहीती देण्यात येईल. वर्षातील विविध योजनांची ‘विकसीत भारताचा अमृतकाळ… सेवा सुशासन गरीब कल्याणची अकरा वर्षे, या पत्रकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी जेष्ठ भाजपा पदाधिकारी विलास हडकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, पंकज सादये, माजी जिप बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, सरपंच विशाखा सकपाळ, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजू परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याठिकाणी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकर्त्यांच्या बळावर यश निश्चित झाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भक्कम साथीने यश निश्चित मिळेल. आज झालेली ही बैठक प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होती. भर पावसातही बैठकीसाठी असलेली ही उत्स्फूर्त उपस्थिती भाजपाचे तळागळात असलेले संघटन बळ निश्चित झाले आहे. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीतही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या ताकदीने व जनतेच्या साथीने सर्वत्र विजयाची पताका फडकेल असा विश्वास धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला