मुलीच्या साखरपुड्याच्या आदल्याच दिवशी काळाने घातला घाला; परिसरात हळहळ व्यक्त_*
*💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी नंदू राऊळ ( वय ६२) या व्यक्तीचे राहत्या घरी आज सायंकाळी आंघोळ करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. उद्या त्यांच्या मुलीचा साखरपुडा होता. तर २ मे ला लग्न ठरले होते. परंतु साखरपुड्याचा आदल्याच दिवशी नियतीने पित्याला हिरावून नेल्याने कोलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेले पंचवीस वर्ष ते सावंतवाडी येथील प्रसिद्ध बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस येथे काम करत होते.
