*💫सावंतवाडी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या संकटाच्या काळात कोव्हिड रुग्णाना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालय समोरील कॉंग्रेस कार्यालयात मदतकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच कोव्हिड च्या गरजू रूग्णाना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोव्हिडच्या गरजू रुग्णानी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी मदतकेंद्राशी खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे, उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख व महिला काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केले आहे. यावेळी त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. इर्शाद शेख – 9404598091, समीर वंजारी – 9822454023, राजेंद्र मसूरकर – 9422435760, विजय प्रभू – 8888008112, किरण टेंबूलकर – 9422580275, विधाता सावंत – 9422077515.
*जिल्हा कॉंग्रेसकडून सावंतवाडी कार्यालयात कोव्हिड मदतकेंद्राची स्थापना
