ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर…

जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र..

सावंतवाडी : ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली संस्था म्हणजेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र. या संस्थेच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सल्लागार अँड. समीर वंजारी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा. रूपेश पाटील, जिल्हा संघटक विष्णुप्रसाद दळवी, सहसंघटक प्रमोद मोहिते, सुकन्या टोपले, स्वप्नील लात्ये, प्रताप सावंत, देवेंद्र नाईक, दत्ताराम नाईक, विनायक गांवस, साबाजी परब आदी उपस्थित होते.
जिल्हा शाखेने आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडू असे आश्वासन नवनियुक्त तालुकाध्यक्ष अमोल केसरकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

You cannot copy content of this page