माणगाव हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षपदी सगुण धुरी यांची फेरनिवड…

उपाध्यक्षपदी बाळा जोशी,सचिवपदी साईनाथ नार्वेकर तर सीईओपदी राजू रांगणेकर..

⚡कुडाळ ता.१५-: माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, माणगांव या संस्थेच्या नुतन अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष असलेले सगुण साबाजी धुरी यांची फेरनिवड झाली आहे. तर सचिव पदी साईनाथ नार्वेकर यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी बाळा जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश उर्फ राजू रांगणेकर तर अंतर्गत हिशेब तपासणी पदी जयंत कुबल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या संस्थेची निवडणूक 31 मे रोजी झाली होती. या निवडणुकीत सगुण धुरी यांच्या पॅनलने नऊ पैकी सात जागांवर तर चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलने दोन जागांवर विजय मिळवला होता. आजच्या निवडीच्या दिवशी निवडणूक निर्वाचन अधिकारी अॅड. बांदेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खालील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले.निवड झालेली पदाधिकारी आणी कार्यकारिणी खालील प्रमाणे-सगुण साबाजी धुरी,उपाध्यक्ष-दत्ताराम उर्फ बाळा जोशी,सचिव- साईनाथ नार्वेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी– मंगेश उर्फ राजू रांगणेकर,अंतर्गत हिशेब तपासनीस– जयंत कुबल,संचालक- विनायक उर्फ बाली नानचे,मेघशाम उर्फ शामा पावसकर, चंद्रशेखर जोशी, योगेश फणसळकर यांची निवड झाली आहे.
शालेय समिती खालीलप्रमाणे– अध्यक्ष-सगुण धुरी,सीईओ- मंगेश उर्फ राजू रांगणेकर,सदस्य-विनायक उर्फ बाली नानचे,मेघशाम उर्फ शामा पावसकर,सचिव- पदसिद्ध मुख्याध्यापक- संजय पिळणकर,शिक्षक प्रतिनिधी,शिक्षकेतर प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली आहे.सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे शाळा,प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक,ग्रामस्थ यांच्या वतीने मुख्याध्यापक संजय पिळणकर,पर्यवेक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page