सिंधूदुर्गनगरी प्राधिकरण व नगर पंचायत क्षेत्रात विद्युत दाहिनी उभारा..

जि प अध्यक्षा संजना सावंत यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी ता २८ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे स्थानिक स्मशानभूमीत दहन करण्यास स्थानिक नागरिकांचा होत असलेला विरोध आणि वादाचे प्रसंग पाहता जिल्हा प्राधिकरण शेत्र व नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये शव विद्युत दाहिनी व्हावी .अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशावेळी मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे दहन स्थानिक स्मशानभूमीत करण्यास तेथील ग्रामस्थांचा प्रखर विरोध होत आहे. तसेच नातेवाईकांचीही उदासीनता दिसून येत आहे. अशावेळी मृतदेहाचे दहन करण्यावरून वादाचे प्रसंग निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्राधिकरण क्षेत्र आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये शव विद्युत दाहिनी होणे अत्यावश्यक आहे .तरी जिल्हा प्राधिकरण क्षेत्रात शव विद्युतदाहिनी व्हावी. त्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page