बांदा मराठा समाजाच्या वतीने रविवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन…!

⚡बांदा ता.०९-: बांदा मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक १५ रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बांदा व बांदा परिसरातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावी या परीक्षांमध्ये मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना ९० टक्केच्या वर गुण मिळाले असतील त्यांना गौरविण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदवीका मध्ये व इतर महत्त्वाच्या असलेल्या परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविले असेल तर त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी लवकरात लवकर नावनोंदणी करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी ज्यांना आर्थिक मदत करायची असेल त्यांनी खजिनदार महादेव सावंत-मोर्ये यांच्याकडे जमा करायची आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा समाजातील सर्व बंधू व भगिनी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page