बांदा ग्रामस्थांनी केला सत्कार..
⚡बांदा ता.०९-: महावितरणचे सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांची मुंबई येथे प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा बांदा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत म्हणाले, अभियंता कोहळे यांनी बांदा शहर तसेच परिसरात महावितरणच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केलीत. बांदा शहरातील वीज पुरवठा सातत्याने सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेत.
यावेळी माजी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर मांजरेकर, गुरुनाथ सावंत, अभी देऊलकर, प्रशांत पांगम, बंड्या खान आदिसह ग्रामस्थ व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कोहळे म्हणाले, आपल्या सेवाकाळात बांदा शहर व परिसरातील ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्य केले. बांद्यात बजावलेली सेवा ही कधीही न विसरता येण्यासारखी आहे.
फोटो:-
बांदा येथे महावितरणचे सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना बांदा ग्रामस्थ. सोबत महावितरणचे कर्मचारी. (छायाचित्र- नीलेश मोरजकर)
