सावंतवाडीत ११ रोजी मोफतरुग्ण तपासणी व ब्लड शुगरतपासणी शिबिराचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०९-: येथील वैश्य भवनच्या खाली असलेल्या श्री स्वामी समर्थ पॉली क्लिनिक येथे बुधवार, ११ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत मोफत रुग्ण तपासणी व ब्लड शुगर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष शिबिरात दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे नामवंत मधुमेह तज्ञ डॉ. आदिल अहमद रुग्णांची तपासणी करणार आहेत. मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाला लक्षात घेता रुग्णांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

शिबिरात प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ५० रुग्णांची HbA1C ब्लड शुगर टेस्ट मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक नागरिकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

नाव नोंदणीसाठी खालील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा:
📞 9403035094 / 942243965

You cannot copy content of this page