मालवण, दि. — प्रतिनिधी
सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी इयत्ता १०वीत ८०% व त्यापेक्षा अधिक आणि १२वीत ७५% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा गौरव सोहळा शनिवार, १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ३ ते ६ या वेळेत नम्रता मंगल कार्यालय, हडपीवाडी-वराड कट्टा, मालवण-कसाल रोड येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वरील श्रेणीत बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप आपली मार्कलिस्ट दिलेली नाही, त्यांनी डॉ. जी. आर. सावंत (कट्टा) यांच्याशी खालील क्रमांकांवर तातडीने संपर्क साधावा:
📞 8999783125 / 9404751946
सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी बांधवांच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
