बांधकाम कामगारांप्रमाणे रिक्षा व्यावसायिक, फेरीवाले, घरेलू कामगारांना मदत दया…

दीड हजार तूटपूंजी मदत असून पाच हजार करा;भारतीय मजदूर संघाच्या हरि चव्हाण यांची मागणी

मालवण दि प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाच्या रेट्यामुळे बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर शासनाकडून जमा केली जाणारी रक्कम ही तूटपूंजी असून त्यात वाढ करतानाच बांधकाम कामगारांबरोबरच रिक्षा व्यवसायिक, फेरीवाले, घेरेलू कामगार यांनाही शासनाने जाहीर केल्यानुसार तात्काळ मदत देण्याची मागणी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री हरी चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कोविड १९ च्या लाॅकडाऊन-२ धर्तीवर अनेक असंघटीत कामगारांना एक हजार पाचशे रुपये आर्थिक मदत जाहीर केली होती ही मदत तूटपूंजी असल्याने सर्व असंघटीत कामगारांना पाच हजार द्यावी अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली होती. शासनाच्या जाहीर धोरणानुसार बांधकाम कामगारांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा करण्यास बांधकाम मंडळाकडून सूरवात झाली आहे. असे असले तरी सदर मदत ही तूटपूंजी असून आणखी साडे तीन हजार रुपये बांधकाम कामगारांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करीत भारतीय मजदूर संघाने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार असंघटीत रिक्षा व्यवसायिक, फेरीवाले, घेरेलू कामगार यांनाही तात्काळ मदत देण्याची मागणी श्री हरी चव्हाण यांनी केली आहे.

You cannot copy content of this page