संतोष वारंग द्वितीय तर नीता सावंत तृतीय क्रमांकाचे मानकरी..
⚡सिंधुदुर्गनगरी ता ६-: सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत सावंतवाडी येथील संजय बांबुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त प्राथमिक शिक्षक पतपेढीने विविध उपक्रम राबविले होते.यापैकी खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी आज जाहीर केला.
सहकार या विषयावर आधारित खुल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक- श्री.संजय कृष्णा बांबुळकर (मळेवाड,सावंतवाडी),द्वितीय क्रमांक- श्री.संतोष सीताराम वारंग (वालावल,कुडाळ),तृतीय क्रमांक-श्रीम.नीता नितीन सावंत (शिरशिंगे, सावंतवाडी),उत्तेजनार्थ क्रमांक- श्री.सतीश सीताराम कदम (कांदळगाव,मालवण),उत्तेजनार्थ क्रमांक- श्री.कृष्णा निवृत्ती साळी (भिवंडी,ठाणे) यांनी प्राप्त केले.सदर स्पर्धेचे परीक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे व तज्ज्ञ संचालक किशोर कदम यांनी केले.
स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना गुरुवार दिनांक १२ जून २०२५ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता संस्थेच्या सभासद सत्कार कार्यक्रमात संस्थेचे प्रधान कार्यालय सभागृहात गौरविण्यात येणार आहे.तरी सर्व यशस्वी स्पर्धकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष चंद्रसेन पाताडे व उपाध्यक्ष ऋतुजा जंगले यांनी केले आहे.
