बांदा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने पर्यावरण दिन साजरा…!

⚡बांदा ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदा या मंडळाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाच्या परिसरामध्ये हापूस आंब्याची कलमे आणि इतर औषधी वनस्पती लावून वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, ज्येष्ठ सदस्य भाऊ वळंजू, गुरु धारगळकर, गुरुनाथ मेस्त्री, बाबा काणेकर, रवींद्र सावंत, सुरज राऊळ, बाळा आकेरकर, बांदा पोलीस कर्मचारी शेखर मुणगेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, महावितरणचे कर्मचारी श्री. कांबळी, सिद्धेश वेंगुर्लेकर, नाना शिरोडकर आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवर मंडळींचे अध्यक्ष संजय नाईक यांनी आभार मानले.
You cannot copy content of this page