निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा भाजप तर्फे गौरव…

वेंगुर्ला प्रतिनिधी- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त
वेंगुर्ला भाजपातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना भाजपा महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धेतील विजेते अनिकेत कुंडगीर (प्रथम), विद्या परब (द्वितीय) यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच उन्नत्ती खांडेकर, जानव्ही कांबळी, वैभवी चिपकर, साक्षी मांजरेकर, सुरेखा चिपकर, युवराज राऊत आदी सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक प्रा.डॉ.सचिन परूळकर यांचाही प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रसन्ना देसाई, पपू परब, सुहास गवंडळकर, राजन गिरप, मनवेल फर्नांडीस, वसंत तांडेल, प्रणव वायंगणकर, वृंदा गवंडळकर, श्रेया मयेकर, आकांक्षा परब, वृंदा मोर्डेकर, हसीनाबेन मकानदार, हेमंत गावडे, मारूती दोडशानट्टी आदी उपस्थित होते.
फोटोओळी – निबंध स्पर्धेतील विजेत्यांना भाजपा महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page