अणाव रामेश्वर मंदिर येथे पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू…

‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत होत आहे काम:आमदार निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थ यांच्याकडून आभार..

⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू झाले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अणाव ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार निलेश राणे यांनी पहिल्या टप्यात पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू असून थोड्याच दिवसात हे काम पूर्ण होईल. आमदार निलेश राणे यांनी रामेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अणाव ग्रामस्थ यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

You cannot copy content of this page