⚡सावंतवाडी ता.०५-: माजी आमदार परशुराम उपरकर यांनी हत्ती प्रश्नी, बेकायदा वृक्षतोड तसेच इको सेन्सेटिव्ह क्षेत्रातील वाढत्या अतिक्रमण प्रश्नी सहाय्यक उपवंनसरक्षक लाड यांना जाब विचारला. या सर्वांवर योग्य तो तोडगा काढा ग्रामस्थाना न्याय द्या अन्यथा हे प्रकार खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा वनविभागाला दिला.
ठाकरे शिवसेना नेते व माजी आमदार परशुराम उपरकर काल बुधवारी सावंतवाडीतील वन विभाग कार्यालयात धडक दिली यावेळी उपवनसरक्षक रेड्डी बैठकीला गेल्याने त्यांनी सहा उपवनसंरक्षक लाड श्री बोराटे यांची भेट घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार आशिष सुभेदार, प्रणित तळकर, मनोज कांबळी, संतोष सावंत, रोहित मुळीक, सुरज साळगावकर गॅब्रियल फूडताडू आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपरकर म्हणाले दोडामार्ग येथील हत्ती प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या भागात अवैध वृक्ष तोड होत आहे यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्या शिवाय इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये अनधिकृत बांधकाम होत आहे त्यावर उपरकर आक्रमक झाले. उपवनसंरक्षक रेड्डी यांच्या कारभारावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर सहाय्यक उपवनसरक्षक श्री लाड श्री बोराटे यांनी हत्ती प्रश्न आवरता घेण्यासाठी वेगवेगळी टिम येउन गेली आहे त्यावर मोहीम सुरु केली जाईल तर वृक्षतोड बंदी नुसार देखील कारवाई सुरू असून इको सेन्सेटिव्ह झोन क्षेत्रात होणारी वृक्षतोड वर वनविभाग लक्ष ठेवून आहे असे सांगितले. यावर उपरकर यांनी वनविभागाच्या कारभारावर उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती करत तुमच्याकडून उतरे नेहमीच दिली जातात मात्र प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे लवकरच वनविभागाच्या सर्व कामांची पोलखोल करणार असा इशारा दिला.
