आंबोली,ता.४: महसूल विभागाने आंबोली सज्जा च्या तलाठ्या ची बदली रद्द करून समुपदेशन पद्धतनीने शासनाने त्यांना याठिकाणी मुदतवाढ देण्यात यावी. यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वती ने निवेदन देण्यात आले आहे. आंबोली येथे कार्यरत तलाठी सुमित घाडीगावकर यांची बदली वेंगुर्ला येथे अन्याय कारक रित्या महसूल प्रशासनाने केली आहे. मात्र अनेक तलाठ्यांना मुदत वाढ दिली आहे. शासनाचे समुपदेशन पद्धतीने बदली करण्याचे आदेश असताना घाडीगावकर यांची बदली ही हेतूपरस्पर वाटते. आंबोली तलाठ्यांच्या बदलीला स्थगिती द्यावी अशा मागणीचे निवेदन आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी दिले होते. आंबोलीत यापूर्वी तलाठ्यांना हाताशी धरून बोगस व्यवहार बोगस नोंदणी घालून जमिनीचे व्यवहार झाले आहेत रेकॉर्ड बनावट नोंदी घातल्या आहेत.महसूल खात्याचा मोठा गौडबंगाल त्यातून दिसून आला होता. त्या आधीच्या तलाठ्यांवर कारवाई ची मागणी देखील ग्रामसभेतुन तसेच निवेदनातून आंदोलनातून शासनाकडे करण्यात आली होती.मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांचे हात यात असल्याने कारवाई झाली नाही. त्यांनतर याठिकाणी तलाठी सुमित घाडीगावकर यांच्या कालावधीत कोणत्याही प्रकार चा गैर कारभार झाला नाही.कोणत्याही कामासाठी विलंभ केला नाही अथवा फी पैसे घेतले नाहीत.ग्रामस्थांना त्यांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे आंबोली येथील जमीन प्रश्न तसेच आणखी आवश्यक कार्यवाही साठी निपक्ष पणे काम होण्यासाठी घाडीगावकर यांना इथे मुदत वाढ देण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याबाबत चे निवेदन ग्रामस्थांनी आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. तलाठी यांची शासनाने बदली रद्द करावी अन्यथा तहसीलदार कार्यलय येथे आंदोलन करण्यात येईल. या निवेदनावर विभाग अध्यक्ष बबन वसंत गावडे, संतोष उर्फ बुधाजी पाताडे,ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,निधी गुरव,महेश नार्वेकर,रामचन्द्र कर्पे,अनिल चव्हाण,रूपा गावडे,बाळा कोरगावकर,सत्यवान गावडे,शशिकांत सावंत,महादेव गावडे,संजय गावडे आदींच्या सह्या आहेत.
आंबोली तलाठ्यांची बदली रद्द करण्यासाठी उबाठा चे महसूल मंत्री व मुख्यमंत्र्यांना निवेदन…
