आ.वैभव नाईक यांच्याकडे बबन बोभाटे यांची मागणी
*💫कुडाळ दि.२८-:* लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी लक्षात घेता. तसेच सद्य स्थितीतीत बस सेवा बंद असल्याने गावातील लोकांना ३० ते ४० किलोमीटर प्रवास करून आरोग्य केंद्रावर यावे लागत आहे. त्यामुळे त्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून, ही गैरसोय लक्षात घेता आरोग्य विभागाने लसीकरण उपकेंद्राच्या मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावेत अशी मागणी शिवसेनेचे बबन बोभाटे यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली आहे . सध्या राज्यभरात सुरू असलेल्या लसीकरण ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येते. प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला लसीकरणाला आरोग्य विभागाने चालू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच १मे पासून अठरा वर्षावरील लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होईल यासाठी मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र चालू केल्यात गर्दी कमी होईल. यासंदर्भात नागरिकांची समस्या मांडत कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्याकडे व कुडाळ तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे शिवसेनेचे बबन बोभाडे यांनी मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे.
