‘त्या’ दोन्ही कोरोना बळीना नगरपालिकेची श्रद्धांजली…

वारंग यांच्या एका नातलगाला अनुकंपाखाली तर परब यांच्या पत्नीला कंत्राटी सेवेत घेणार नगराध्यक्ष संजू परब यानी व्यक्त केला मानस

*💫सावंतवाडी दि.२८-:* नगरपालिकेतील दोन कर्मचाऱ्यांचे काल कोरोनामुळे निधन झाल्याने नगरपालिकेच्या वतीने आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या दुःखात आपण सहभागी असून, वारंग यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा खाली नियुक्तीचा लाभ देण्यासाठी तर कंत्राटी कामगार कमलेश परब यांच्या पत्नीस नगरपरिषदेच्या सेवेत कंत्राटी कामगार म्हणून नेमणूक देण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, नगरपालिका, महानगरपालिका यामधील कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून समावेश करून त्यांना विमा संरक्षण लाभ मिळवून देणे गरजेचे असल्याचे मत देखील त्यानी व्यक्त केले आहे. तसेच शहरातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करणे गरजेचे असून, याचा विचार शासन स्तरावर होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी लसीकरण करण्यासाठी आवश्यक ती जागा नगरपालिका उपलब्ध करून देईल असे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page