⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक वर्ष २०२४ – २५
एस् . एस् . सी परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली . यामध्ये प्रथम .कु. जीया बशीर शेख ( ९७.८० % ) , द्वितीय कु . खुशी संतोष गवस (९५ . ८०% ) तृतीय कु . इनान आलीम बंगलेकर व कु . संजना सुरेशकुमार सुंदेशा ( ९०.४० % ) तर कु . दानिया बिलाल बंगलेकर( ८९ .८० %) गुण मिळवून चौथा आणि कु . प्रतिक्षा सुभाष गावडे
(८९ . ६० % ) गुण मिळवून
पाचवी आली . या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा मंगळवार
दि. २७ -०५ – २०२४ रोजी प्रशालेत संपन्न झाला . या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य श्री . भरत गावडे , सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष श्री . इम्तियाज खानापूरी , उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग , सहसचिव श्री.सुलेमान बेग , विश्वस्थ श्री . समीर बागवान व श्री. मुश्ताक बागवान, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला
हेशागोळ , केजी विभागाच्या इन्चार्ज श्रीम. फरीदा बागवान , पालक प्रतिनिधी श्रीम . निकिता साटेलकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते .प्रशालेच्या मुख्याधापिका श्रीम. निर्मला हेशागोळ यांनी पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .
सहाय्यक शिक्षिका श्रीम. निलम सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक व पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी कु . जीया शेख, कु . खुशी गवस , कु . इनान बंगलेकर व कु . संजना सुंदेशा यांना पुष्पगुच्छ व धनादेश देऊन प्रशालेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून कु . जीया शेख, कु. खुशी गवस, कु . दानिया बंगलेकर, कु . इनान बंगरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . पालकांनी आपल्या मनोगतातून प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . सहाय्यक शिक्षिका श्रीम. स्मृती गवस यांनी पालक व शिक्षक या दोन्ही भूमिकेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे सहसचिव श्री. सुलेमान बेग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . सर्व विदयार्थ्यांनी निर्णयक्षम बना व संयम बाळगा ,असे मौलिक विचार संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले . विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपले छंद जोपासावे तसेच आपले व्यक्तिमत्व व संस्कार जपावे , असे बहुमोल मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री . भरत गावडे सरांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक
.शिक्षिका श्रीम. श्रुती गोडकर यांनी आभार व्यक्त केले . उपस्थित सर्वांनीच प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये एस् . एस् . सी . विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा उत्साहात संपन्न …
