पण त्यांच्या अनुपस्थितित केबिनमधून कारभार कोण चालवतो ? हे मिलिंद मेस्त्रींनी पहावे मनसेच्या दया मेस्त्रींचा पलटवार
*💫 कणकवली दि.२८-:* जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोरोना महामारीच्या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देत असल्याबाबत मनसेचे कोणतेही दुमत नाही. परंतु त्यांनी दिलेले आदेश किती कर्मचारी पळतात हे तपासून पाहण्याची गरज आहे. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या केबिनमध्ये बसून कोण कारभार चालवतो हे मिलिंद मिस्त्री यांनी जाऊन पहावे असे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी म्हटले आहे. मुंबई-गोवा महामार्गाबाबत परशुराम उपरकर यांनी अनेकदा पत्रव्यवहार व आंदोलने केलीत जनतेच्या प्रश्नासाठी ते सतत प्रयत्न करत असतात .आपल्या गावातील सरपंच काळात आपण कोणता विकास केला कोणकोणत्या प्रकारे जनतेला त्रास दिला यांची जंत्री वाचायला आम्हाला भाग पाडू नये असे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी म्हटले आहे.
