प्राणजीवन संस्थेने वागदेमध्ये केले निर्जतुकीकरण..

*💫कणकवली दि.१८-:* प्राणजीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून संस्थाध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या सौजन्याने कणकवली नजीक वागदे गावातील कंटेनमेंट झोन आणि शासकीय कार्यालयांत मोफत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. यावेळी सरपंच पूजा घाडीगांवकर, उपसरपंच रुपेश आमडोसकर, ग्रामसेवक ऋतुराज कदम, ग्रा.पं. कर्मचारी संदीप गावडे, प्राणजीवन सहयोग संस्थेचे कार्यक्रमप्रमुख प्रसाद मेहता, सहप्रमुख प्रशांत गावडे, चकोर सावंत, सिद्धेश परब, विजय परब, शुभम सावंत, अनिप सावंत आदी उपस्थित होते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून शहरासोबत गावागावांत कोव्हीड रुग्ण आढळू लागले आहेत. अशा वेळी कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाच खरा उपचार आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्राणजीवन सहयोग संस्थेच्या वतीने वागदे गावात आज सकाळी निर्जंतुकीरण फवारणी करण्यात आली.

You cannot copy content of this page