Headlines

अन्याया विरोधात चिड असणारा, अन्यायग्रस्ताना न्याय देणारा…

सामाजिक कार्यकर्ता म्हणजे ‘अमित वेंगुर्लेकर’

*💫सावंतवाडी दि.२८-:* जिल्ह्यातील एक आक्रमक आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे नेतृत्व म्हणून श्री. अमित वेंगुर्लेकर यांनी आपली ओळख जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली आहे. समाजसेवा हीच ईश्वरसेवा असे मानून प्रामाणिकपणे अन्यायग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अन्यायाविरुद्ध असलेली चीड आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची त्यांची धडपड, त्यांची समाजसेवेची वृत्ती पाहूनच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी ट्रस्टचे राष्ट्रीय निरीक्षक डॉ दिपक परब यांनी निवड करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. अमित वेंगुर्लेकर यांच्या समाजसेवेच्या कार्यामुळे त्यांना शिव सन्मान पुरस्कार, लोकनायक युवा पुरस्कार, इंटरनॅशनल प्राउड ऑफ इंडिया पुरस्कार, दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड यासारखे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सावंतवाडी तालुक्यात राजमाता को – ऑपरेटिव्ह सोसायटीची शाखा सुरू करून कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. कट्टर निलेश राणेसमर्थक म्हणून काम करणारे अमित वेंगुर्लेकर सावंतवाडीत सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळून त्यानी त्याची साथ सोडत शिवसेनेत जाहीर प्रवेश करत जोरदार धक्का दिला. शिवसेनेत प्रवेश करताच त्यानी समर्पित होत केलेल्या कामाचे फळ म्हणून त्यांना काहीच वेळात शिवसेनेत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या कामाचा धडाका पाहत पुन्हा एकदा त्यांच्या कामाचा गौरव करत हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या राज्य चिटणीस पदावर नियुक्ती कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री. अप्पा पराडकर यांच्याकडून करण्यात आली आहे. तर समाजाप्रती झोकुन देत काम करण्याची त्यांची वृत्ती आणि त्याचे समाजाप्रती असलेले काम पाहत ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव पदी त्यांची नियुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष श्री. किशन गोयल आणि उपाध्यक्ष मोहमद यासीन शेख यांनी केली आहे. अमित वेंगुर्लेकर यांनी आपल्या कामातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना काळात अनेक गरीब, अंध अपंग जनतेला मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कोरोना काळात अनेक ठिकाणी होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवत न्याय मिळवून दिला. लॉक डाऊन काळात फायनान्स कंपनी, विज वितरण यांच्याकडून होत असलेल्या वसुलीवर त्यानी आपल्या कामातून रोख लावली. कोरोना काळात परिवहन मंडळाच्या कारभारावर त्यानी प्रश्न उपस्थित करत, अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. कोरोना रुग्णालयातील विदारक स्थिती कानावर आल्यावर स्वतः पीपीई किट घालत थेट कोरोना बाधित रुग्ण ठेवलेल्या वॉर्ड मध्ये प्रवेश करत परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर ती परिस्थिती सुधारण्यासाठी त्यानी तशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. विविध अन्यायाना सामोरे जात त्यानी अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून दिला आहे. नोकरीची आमिष दाखवून नंतर पिंगमी एजंट म्हणून नियुक्ती करण्यास नकार दिलेल्या अपंग युवकास त्यानी मदतीचा हात देत आपल्या राजमाता को ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये नियुक्ती दिली. अशा विविध कामे करून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे समाजकार्य अतुलनीय आहे. अशा या समाजसेवकास ग्लोबल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज कडून जन्मदिनाच्या आणि भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

You cannot copy content of this page