आमदार निलेश राणे यांनी घेतला एसटी सेवेचा आढावा…

कुडाळ बसस्थानकातील सुविधांबाबत चर्चा..

कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी आज आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बस डेपोतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक वाहतुकीची सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत कुडाळ एस.टी स्थानक व आगारातील दुरवस्थेबाबत तसेच दररोज उशिरा सुटणाऱ्या गाडया तसेच अचानक गाडया रद्द होण्याचे वाढलेले प्रमाण याबाबत सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाचे विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी आमदार निलेश राणे यांनी वासुदेवानंद सभागृह कुडाळ येथे झालेल्या आढावा बैठकीत चर्चा केली. तसेच कुडाळ स्थानकावरील नवीन बसस्थानक इमारत बांधताना आराखड्यातील तांत्रिक चुकांमुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार महोदयांचे लक्ष वेधले. या तांत्रिक चुका दुरुस्त करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिले.
संघटनेचे केंद्रीय नेतृत्व रोशन तेंडुलकर, विभागीय सचिव भरत चव्हाण, कुडाळ आगार अध्यक्ष दादा साईल, कार्याध्यक्ष सुनील बांदेकर, प्रशांत गावडे, संजय हुमरमळेकर, आगार सचिव मिथुन बांबुळकर, महेश तावडे, निलेश कसालकर तसेच परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यशाळा यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड उपस्थित होते.
कुडाळ आगाराला एस.टी प्रशासनाकडून सीएनजी बसेस दिल्यामुळे वाहतूक कोलमडलेली असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सुजित डोंगरे यांनी वस्तुस्थिती सत्य असल्याचे सांगत सीएनजी बसेस झाराप पंपावर भरण्यासाठी जात असल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत येत्या दोन ते तीन दिवसात कुडाळ आगारातील जागा सीएनजी पंपासाठी देण्यात येणार असून, येत्या दोन ते तीन महिन्यात आगारातील पंप सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. कुडाळ बसस्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या एस.टी बसेसचे प्रमाण पाहता प्रवाशांसाठी असलेली बैठक व्यवस्था अपुरी असून स्थानकाचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने असल्याचे रोशन तेंडोलकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणले. आमदार निलेश राणे यांनी याबाबत एसटी प्रशासनाकडून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी कुडाळ आगाराला नवीन बसेस न मिळाल्याबाबत सांगितले असता परिवहन मंत्र्यांशी भेट ठरवून लवकरात लवकर कुडाळ आगाराला दहा बसेस उपलब्ध करून देण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले. जुन्या कुडाळ एसटी बस स्थानकात पोलीस चौकी होती तशाच प्रकारची पोलीस चौकी स्थानकात असावी अशी मागणी करण्यात आली. आमदार निलेश राणे यांनी यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली. तसेच कुडाळ आगाराला आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या काही दिवसात प्रश्न मार्गी लावणार येतील असेही त्यांनी सेवाशक्ती संघर्ष कर्मचारी संघांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. यावेळी शक्ती संघर्ष कर्मचारी संघ कुडाळ शाखेच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा शाल,पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page