अवकाळी पावसाने वेंगुर्ला तालुक्यात सव्वा दोन लाखांचे नुकसान…

वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेली विहिर कोसळली..

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुक्यात २० व २१ मे या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसाने ठिकठिकाणी पडझड झाली असून तालुक्यात सुमारे सव्वादोन लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर खंडित झालेला विजपुरवठा सुमारे २० तासांनी सुरळीत झाला.

  मंगळवारी सायंकाळी वेंगुर्ला शहरासह ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या लखलखाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेली विहिर कोसळून सुमारे २ लाख रूपयांचे नुकसान झाले. रेडी येथील सावित्री विष्णू सातजी यांच्या घरावर सुपारीचे झाड पडून १५ हजारांचे नुकसान तर सखेलेखोल येथील अंगणवाडी शाळेची कंपाऊंड वॉल कोसळून आर्थिक नुकसान झाल्याची माहिती वेंगुर्ला तहसील कार्यालयाच्या आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे. तर १६२ मी.मी.एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी खंडित झालेला विज पुरवठा बुधवारी दुपारी १२.३०च्या सुमारास सुरळीत झाला. दिर्घकाळ खंडित झालेल्या या विज पुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल झाले.
You cannot copy content of this page