साळेल मध्ये ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का…

कमलाकर गावडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश : निलेश राणे, दत्ता सामंत यांची उपस्थिती…

⚡मालवण,ता.१९-:
माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, सरपंच रवींद्र साळकर यांच्यासह अन्य सदस्य व माजी सरपंचांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

साळेल येथील रहिवासी व पंचायत समितीचे माजी सदस्य कमलाकर गावडे, चालेल सरपंच रवींद्र साळकर माजी उपसरपंच गणपत पडवळ, ग्रामपंचायत सदस्य भानजी गावडे, माजी सरपंच नाना परब यांनी आज आमदार निलेश राणे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. गेल्या काही महिन्यात ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे सेना कमकुवत बनली आहे. ठाकरे सेनेतील अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत असल्याने ठाकरे शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. साळेल मधील या लोकप्रतिनिधींच्या पक्षप्रवेशाने ठाकरे शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे.

या पक्षप्रवेशावेळी राजा गावडे, दीपक पाटकर, मंदार लुडबे, हेमंत चव्हाण, बाबू चव्हाण, भाऊ मोर्जे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page