⚡बांदा ता.१९-: खेमराज हायस्कुल समोर नवीन बनविण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यालगत बाजूपट्टी नसल्याने अनेक अपघात होत होते. याची दखल घेत ग्रामपंचायतच्या वतीने दोन्ही बाजूला माती टाकून बाजूपट्टी करण्यात आल्याने वाहनचालकातून समाधान व्यक्त होत आहे.
. खेमराज हायस्कुल-ग्रामपंचायत रस्ता हा सिमेंटचा बनविण्यात आला आहे. या रस्त्याला बाजूपट्टी नसल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना अनेक वाहने रस्त्यावरून खाली उतरून अपघातग्रस्त होत होती. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतचे लक्ष वेधण्यात आले होते. याची दखल घेत ग्रामपंचायतने बाजूपट्टीचे काम करून दिले.
माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सौ. रुपाली शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम यांनी उपस्थित राहत बाजूपट्टी बनवून घेतली. यामुळे वाहनचालकातून समाधान व्यक्त होत आहे.
