⚡बांदा ता.१३-: विद्या विकास मंडळ इन्सुली संचालित नुतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीची विद्यार्थिनी कु. रेश्मा संदेश पालव हिने ९९.४० टक्के गुण मिळवीत प्रशालेत आणि सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिच्या यशामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे. इन्सुली सारख्या ग्रामीण भागातील ही विद्यार्थिनीं असुन कोणताही ज्यादा क्लास न घेता केवळ शाळेत मिळणाऱ्या अभ्यासातूनच तिने हे यश संपादन केले आहे.
विद्या विकास मंडळ इन्सुलिच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या घरी जात तिचे पुष्पगुछ देत अभिनंदन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त पोलीस निरीक्षक अशोक सावंत, उपाध्यक्ष महेंद्र सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, खजिनदार सदानंद कोलगावकर, रेश्माचे वडील संदेश पालव, माजी अध्यक्ष दिलीप कोठावळे, माजी अध्यक्ष उमेश पेडणेकर,माजी सचिव सचिन पालव, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, सहा शिक्षक दिगंबर मोर्ये, विनोद चव्हाण, विद्या सावंत, चंद्रलेखा परब, शिक्षकेत्तर कर्मचारी ठकू पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी हे मेहनती व हुशार असतात हे परत एकदा कु. रेश्माने दाखवून दिले आहे. रेश्माने आज आपल्या गावाचे आणि प्रशालेचे नाव वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तिच्या यशात तिची जशी मेहनत महत्वाची आहे तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या नुतन माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांची सुद्धा महत्वाची भुमिका आहे. भविष्यात तिने याही पेक्षा मोठे यश मिळवून आपल्या गावाचे शाळेचे नाव राज्यात झळकावे यासाठी मेहनत घ्यावी अशा शुभेच्छा दिल्या.
इन्सुलीची विद्यार्थिनी कु. रेश्मा पालव ९९.४० टक्के गुण मिळवीत सावंतवाडी तालुक्यात प्रथम…!
