सीताराम गावडे:यशस्वी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे..
⚡सावंतवाडी ता.१३-:
दहावी बारावीच्या परीक्षेत ज्या मराठा मुला मुलींना ७० टक्के च्या वर गुण मिळाले आहेत अशा मराठा समाजातील मुलांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे व ज्या मराठा मुला मुलींना ९० टक्क्याच्या वर गुण मिळाले आहेत अशा मुलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने दरवर्षी दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांंचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो.या वर्षीही ७० टक्के च्या वर गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंचा गौरव करण्यात येणार आहे यासाठी विद्यार्थ्यांनी आपली नावे.७९७२६४८७८१ व ९४२३३०४८५६ या व्हाट्सअप नंबर नोंदवावीत असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.