*💫सावंतवाडी दि.२९-:* तालुक्यातील सोनुर्ली येथील सौ. श्रुती सत्यवान मसुरकर ही महिला मळगाव येथून बेपत्ता असल्याची फिर्याद काल रात्री तिच्या पतीने पोलिस स्थानकात दिली आहे. काल सकाळी आपल्या पतीसह मळगाव येथे आल्यानंतर आपण बँकेत जाऊन येते असे सांगून गेलेली श्रुती मसुरकर सायंकाळ पर्यंत घरी न आल्याने तिची सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. परंतु ती न सापडल्याने अखेर काल रात्री उशिरा याबाबतची तक्रार पती सत्यवान मसुरकर यांनी पोलिस स्थानकात दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.
सोनुर्ली येथून विवाहित महिला बेपत्ता….
