शासनाच्या नवीन नियमावलीचे काटेकोर पालन;केवळ मानकऱ्यांच्या उपस्थितीत जत्रोत्सव साजरा
*💫सावंतवाडी दि.२८-:* मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव २९ नोव्हेंबर रोजी शासनाच्या नवीन नियमावलीचे काटेकोर पालन करून फक्त मळगावातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत एकदम साध्या पध्दतीनेसाजरा होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात न येता घरी राहूनच रवळनाथ चरणी नतमस्तक व्हावे, असे आवाहन देवस्थान कमिटी व मानकऱ्यांतर्फे करण्यात आले आहे