Headlines

सलुनच्या आधुनीक शिक्षण तंत्रज्ञानातुन, प्रगती करा…

प्रशिक्षक सचिन टक्के:सलुन व ब्युटी पार्लर व्यावसाईकांना प्रशिक्षण,सेमीनरचे आंतरराष्ट्रिय मुख्य, प्रशिक्षक सचिनजी टक्के,..

⚡सावंतवाडी ता.३०-: कोणतीही कला ही कालाकाराला जिवंत ठेवते. केशकर्तन व सौंदर्य खुलवणे हि एक अफलातुन कला कालाकाराने जन्माला घातली आहे. ही कला खर्‍या अर्थाने माझ्या बरोबरच, माझे सहकारी यांनी आत्मसात करुन या कलेवर आम्ही जिवापाड प्रेम केले, म्हणुनच आम्ही यशस्वी होऊन आपणाला चांगले खात्रीचे शिक्षण देऊ शकतो. असे प्रशिक्षण केशकर्तनचे आंतरराष्ट्रिय प्रशिक्षक सचिन टक्के यांनी सावंतवाडी येथे सलुन व ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थींना दिले.

सावंतवाडी येथे आधुनिक केशकर्तन व सौंदर्य खुलवणारे एक दिवशीय प्रशिक्षण आणि लकी ड्रॉचे आयोजन २८ एप्रिल रोजी. सलून ब्युटी पार्लर असोसिएशन व महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ सिंधुदुर्ग, ता. सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, सावंतवाडी येथे, सावंतवाडी नाभिक संघटने तर्फे संपन्न झाले, यावेळी सचिन टक्के बोलतांना पुढे म्हणाले, तुम्ही एक कलावंत आहात. आम्ही दिलेले केशकर्तन व सौंदर्य खुलवण्याचे सर्व आधुनीक ज्ञान, एकाग्रतेंने आत्मसात केलात तर तुम्ही एक निष्णांत कलाकार होऊ शकता. पारंपारीकतेची कास धरत आधुनिक केशकर्तन ज्ञानाने तुम्ही सर्वार्थाने मोठे होऊ शकता.
सौंदर्य खुलवणारे प्रॅक्टीकली ज्ञान देतांना प्रसाद चव्हाण म्हणाले, मेकअप, व्यक्तींच्या चेहर्‍यावरील सौंदर्यातील कमतरता लपवते. सौंदर्य खुलवतांना एकाग्रतेंने लक्ष देऊन काम केले तर, आर्थीक प्रगती दुर नाही. तर तुषार चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. तसेच सौ. हर्षदा टक्के, सौ. सुप्रिया टक्के, ट्रिक्स प्रोफेशनल ट्रेनर त्रिशा चहाण, यांनीही प्रॅक्टीकली शिक्षण दिले

यावेळी राज्य नाभिक महामंडळाचे सरचिटणीस राजन पवार, स्वागताध्यक्ष सदानंद पवार, जिल्हाध्यक्ष जगदीश सु. चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, महिलाध्यक्षा सौ. प्रतिभा प्र. चव्हाण, युवाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, सावंतवाडीचे समाजसेवक व कार्यकर्ते दळवी, नारायण राणे, नाभिक संघटणेचे जेष्ठ मार्गदर्शक शांताराम वेतोरेकर, हनुमंत कारीवडेकर तालुका युवाध्यक्ष अक्षय चव्हाण व पदाधिकारी व बांधव उपस्थित होते.

सहभागी प्रशिक्षणार्थींना लकी ड्रॉ बंपर धमाका मध्ये अनेक बक्षिसे मिळाली. पहिले बक्षिस बार्बर चेअर सौ. चव्हाण यांना मिळाले. आचरा येथील सार्थक विलास आचरेकर, श्रावणचे जगदिश चव्हाण, बांद्याचे उमेश चव्हाण, यांना ड्रायर, ट्रिमर अशी बक्षीसे मिळाली. तर प्रत्येक तिकीट धारकांस, प्रशस्तीपत्रक व रिटर्न गिफ्ट बक्षिस मिळाले.

 या कार्यक्रमाचे नियोजन  राजन पवार सदानंद पवार सुनिल न्हावेलकर, जेष्ठ कार्यकर्ते  शांताराम वेतोरेकर, हनुमंत कारीवडेकर यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तालुक्याचे युवाध्यक्ष अक्षय चव्हाण, तुषार पवार, प्रथमेश धारगळकर व नाभिक बांधवांनी केले.
You cannot copy content of this page